Showing posts with label श्रीदासुत. Show all posts
Showing posts with label श्रीदासुत. Show all posts

गझल : श्रीदासुत


प्रेमातल्या ज्वराचा चढतोय रोज पारा
आता कुणी तरी रे माझा करा उतारा

सखये तुझ्या मनाचा ताबा मिळेल जेव्हा
तेव्हाच काळजाचा बदलेल सातबारा

विद्युत प्रवाह आता खंडित नको करू तू
जर आपुल्या मनाच्या जुळल्यात छान तारा

काळिज तुलाच राणी अख्खे बहाल केले
नियमित देत जा ना प्रेमात शेत सारा

तू घट्ट हात माझा पकडून ठेवला तर
गवसेल मग तुलाही प्रेमातला किनारा

मी नाव पावसाचे बघ घेतले मघाशी
अंगावरी तुझ्याही आलाच ना शहारा!

इतकी नको भिजू तू अल्लडपणे कधी की
माझ्या सवे तुलाही झोंबेल गार वारा

भर श्रावणा मध्ये तू दरवळ उगाच केला
नाजूकश्या सरींचा सुटलाय तोल सारा

समजत मलाच नाही गोळा कसा करू मी
मांडून भावनांचा जर ठेवला पसारा
.................................... 

हिरालाल बागुल