गझल : सागर प्रकाश


आयुष्याला पास म्हणालो
श्वासाला मी ऱ्हास म्हणालो

जनावरांना चारा नाही 
दुष्काळाला फास म्हणालो

किती साकडे कुणास घालू
भक्तीलाही भास म्हणालो

कुणास नाही त्याची चिंता
सदा तुझा विश्वास म्हणालो

अवती भवती इथे भामटे
सावाचाही त्रास म्हणालो

जो तो येतो लुटून जातो
संचित माझे बास म्हणालो

दु:ख सोसतो हासत कोणी
त्याला 'सागर' खास म्हणालो

....................................
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
ताळगाव, गोवा

९०११०८२२९९

No comments:

Post a Comment