Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts
Showing posts with label हेमंत पुणेकर. Show all posts

दोन गझला : हेमंत पुणेकर


१.

एक बेसावध क्षणी
काय हे घुसले मनी?

ऐकतच नव्हते कुणी
खूप चालली बोलणी

काय हे मी बोललो?
नव्हते जे ध्यानीमनी

कैदखाना हा जुना
छान आहे बांधणी!

शिकवत असतो तो धडे
रोज घेतो चाचणी

२.

(गा गालगाल गाललगा गालगाल गा)

मी एकदाच बोललो माझ्या मनातले
त्यासाठी काय काय मग ऐकावे लागले

डोळ्यंच्या कोपऱ्यात ते पाहून आली ओल
नजरेत तुझ्या दिसायचे ते प्रेम आटले

एक तूच नाही बघतोये जो निर्णयाची वाट
कोर्टात तिच्या पडूने असे कैक मामले

माझे तुझ्या विना इथे पडते न पाउल एक
माझ्या विना तुझे कसे चाललेय चांगले?

मोडा कितीही आकडे, पण शेवटी जीवन
शून्यातून आले आहे नी शून्यात चालले
...............
हेमंत पुणेकर