१.
थेंब थेंब मी साचत गेलो,
माझ्यातच मी गोठत गेलो
कधी ऊन तर कधी सावली,
क्षणा क्षणाला भासत गेलो
आयुष्याचे दु:ख अनावर,
पानोपानी मांडत गेलो
तुझ्या स्मृतींच्या छटा गुलाबी,
जीवनभर मी चाळत गेलो
सुख दु:खाच्या गंध,फुलांनी,
घर,अंगण मी सजवत गेलो
रास मांडली तू ता-यांची,
कवडश्यात मी नाहत गेलो
भाळावरची रेष मोडण्या,
जीवनभर मी भांडत गेलो
पण जगतो मी आनंदाने,
हेच नेमके सांगत गेलो
तरी तुझ्या ना कधी मंदिरी.
मी अश्रूंना गाळत गेलो
जरी दिले तू काटे मजला.
फुलॆ तुला मी वाहत गेलो
अनंत इच्छा इथे मनाच्या
हसता हसता जाळत गेलो
२.
अवघड जागी दुखणॆ आहे कुणा कळावॆ
चिंते मध्ये अपुल्या आपण जळत रहावॆ
आणा भाका शपथा सा-या खॊट्या होत्या,
जे झाले ते स्वप्न समजुनी विसरुन जावॆ
पोट मागतॆ भाकर मजला संध्याकाळी,
पाण्याचॆ मग पॊटावरती झाकण द्यावॆ
शाळा सुटली, पाटी फुटली किती आठवॆ,
बाल मनाचॆ पंख लावुनी उंच उडावॆ
घरट्या मध्यॆ वाट पाहतॆ माय बिचारी,
मावळतीला चिल्यापिल्यांनी घरी निघावॆ
कॊरत जावी जखम पुराणी पुन्हा नव्यानॆ
ठेच लागली होती कैसे स्मरण असावॆ
विसरुन जावॆ लाख वाटलॆ जरी मनाला,
हृदय सारखे तिलाच स्मरते काय करावॆ?
३.
तळहाताच्या रॆषेवरती कधि विसंबून जगलॆ नाही,
लाख संकटॆ वळचळणीवर, तरी जराही खचलॆ नाही
संघर्षाची ज्यॊत पेटती मनात आहॆ अजून माझ्या
दॊष ठेवुनी नशिबावरती, आयुष्यावर रुसलॆ नाही
नसॆ तमा मज अंधाराची 'सूर्य' गॊंदला मी भाळावर
दु:खाचा मी पदर धरूनी कधी आजवर रडलॆ नाही
आपुलकीचॆ किती मुखवटॆ लावुन फिरती दुनिया सारी
कॊण आपले,कॊण पराये हेच आजवर कळलॆ नाही
अंतिम टप्पा आयुष्याचा चूक आपली स्मरण्यासाठी
पश्ताव्याच्या आगीमध्यॆ कॊण असॆ जॆ जळलॆ नाही
No comments:
Post a Comment