भारावल्या सुरांना, भेटून एकदा जा
पडला सडा फुलांचा, वेचून एकदा जा
रमवू किती रमेना, वळवू किती वळेना
बेचैन काळजाला, खेचून एकदा जा
आला तुफान वारा, पाऊस घेवुनी हा
या अंगणात माझ्या, नाचून एकदा जा
चुकुनी तरी मिळावा, मुखडा तुझा बघाया
गर्दीत चालताना, खेटून एकदा जा
केली कितीक कवने, गझला तुझ्याच साठी
काढून वेळ थोडा, वाचून एकदा जा
.................................
अनंत कदम गीतकार संगीतकार.
मो-8830932566
9503205353. (वॉट्सप व कॉल )
No comments:
Post a Comment