दोन गझला : नरहर कुलकर्णी


१.

जरा हासण्याने तिचे काय जाते
जरा लाजण्याने तिचे काय जाते. 

उगा जीव बोलून जाळून जाते., 
हळू बोलण्याने तिचे काय जाते 

कसे वाटते रोज भेटून मजला ? 
खरे सांगण्याने तिचे काय जाते 

कधी स्वप्न जागेपणी ही पहा ना, 
जरा जागण्याने तिचे काय जाते 

मला फक्त माहीत आहे कधीचे 
मला टाळण्याने तिचे काय जाते  

जरासे रुसावे जरासे हसावे 
असे वागण्याने तिचे काय जाते 

२.

गाठता आला न मज , पल्ला कधीही 
थांबलो, केला न मी कल्ला, कधीही 

पाहिजे ते मिळवतो मी कष्ट करुनी, 
मारतो ना  मी  घरी  डल्ला, कधीही 

पाहतो  ही  माणसे  चोहीकडे  मी , 
देव ना मी  पाहिला अल्ला, कधीही 

समजुनी  मी  घेतले  लोकास सा-या 
फसवुनी भरला न मी गल्ला, कधीही 

राखतो  स्वातंत्र्य, देवुन  प्राण  अपुले , 
करत  नाही  मी  उगा  हल्ला , कधीही 

पाहिजे असल्यास मी दुस-यास देतो 
घेतसे  माझा  न  मी  सल्ला, कधीही

No comments:

Post a Comment