मनात ठेवली तिने टिपून शायरी
जिवंत राहिली इथे म्हणून शायरी
पदोपदी जरी तुला मिळेल दाद पण
भरेल पोट ना तुझे लिहून शायरी
जगायचा जसा इथे तसाच व्यक्त हो
मिळेल काय वेगळी करून शायरी
मला कळ्या फुला शिवाय सांग शायरा
नवीन कोणती तुझी अजून शायरी
अखेर बस मला कमाल हीच वाटली
तुझीच ऐकली तुझ्या कडून शायरी
.......................
गिरीष खोब्रागडे ब्राम्हणवाडा (पूर्व ) 8262912741
.
No comments:
Post a Comment