१.
दिलदार दुःख देते,संसार दुःख देते
चिल्लर व्यथा बघाना,कलदार दुःख देते
कीर्ती कुणा मिळाली,का वारश्यात सांगा?
भिंतीस टांगलेली , तलवार दुःख देते
वाटे निघून जावे , गर्भात प्रेयसीच्या
एकांत जीव घेतो , दरबार दुःख देते
स्वप्नास हाय डसती कोपरडि-खैरलांजी
ही वांझ झोप साली,गर्भार दुःख देते
इस्टेट ठेव तारण,पण श्वास मोकळा घे
जल्लाद जीवनाचे , उपकार दुःख देते
गर्तेत खोल जाणे ते ही मनाप्रमाणे
बुडत्यास काय सांगू ,आधार दुःख देते ?
भेटून कैकदाही,जर 'मन' अतृप्त सज्जन
आजन्म मग प्रतीक्षा,चवदार दुःख देते!
२.
अपघात, हार्ट ब्रेकप,संकट नथिंग आहे
श्वासा तुझ्या उरावर ,माझी धतींग आहे !
मी जन्मतः कशाला ,करतो प्रसन्न मृत्यू ?
मुज्जोर जीवनाचे , फुटणार बिंग आहे
झोपेल बायकोच्या इच्छेविना न सोबत
नवरा फकीर दिसतो,डॅशिंग किंग आहे !
ऐना, बघे स्वतःला, डोळ्यांमध्ये तिच्या हो
मन, वाचतात डोळे,चाणाक्ष भिंग आहे !
प्याल्यात आठवांच्या बघ कॉकटेल तौबा ;
भेटो कुणी कुणा ना? स्मरणात झिंग आहे
मन फेविकॉल झाले चिकटे सखी अभासी?
श्वासात फोन वाजे गुलजार रिंग आहे
३.
तुझे मी नाव लाटांवर खुबीने कोरूनी आलो
धरेवर हाय येतांना किनारे काढुनी आलो
अशा मोडू नका माना,फुलांच्या वेदना जाणा
बघा एकाफुलासाठी,
किती काट्यातुनी आलो
जयंती,लग्न,पार्टी डांस बघुनी थरथरे डी.जे. यमाच्याही उरावर मी कितीदा नाचुनी आलो.
दलित-निग्रो कथा गुंफत म्हणे लोरी,गरीबीहो
भुकेला कैकदा ऐसे उपाशी झोपुनी आलो
विजयश्री चुंबिते रक्ताळ माथा, झुंजणारा बघ
प्रयत्नांच्या पहाडावर ललाटा घासुनी आलो
....................................
रविप्रकाश (चापके)
88 5585 5585
एक से बढकर एक! हार्दिक अभिनंदन बंधुराज!
ReplyDeleteवाह...खासं
ReplyDelete