अफसाना बयाँ करणारी कलीम खान यांची एक तवील गझल : समीना शेख



समीना शेख ही कविवर्य कलीम खान यांची मुलगी.आपल्या वडिलांच्या १०६ शेरांच्या दीर्घ गझलविषयी त्यांनी लिहिलेला हा लेख.
....................................................

                        कविवर्य कलीम खान यांची १०६ शेर असलेली एक गझल आहे. जिचं शीर्षक त्यांनी 'एक तवील ग़ज़ल' असं दिलं आहे.तवील म्हणजे लांब,मोठी गझल.संपूर्ण गझल वाचल्यावर मला अस जाणवलं की ही गझल एका प्रेमाची संपूर्ण कथा आहे.एक मुकम्मल अफसाना आहे. प्रियकराच्या शब्दात ती कथा गझलच्या रुपात समोर येते.गझलच्या सुरवातीला जेव्हा ते भेटतात तेव्हा  तो प्रियकर म्हणतो -

दिल के अरमां जगाकर गए वो
हाय अल्लाह क्या कर गए वो

हो गया जिंदगी भर का सामां
चंद लम्हे बिताकर गए वो

फूंक दी जान बेजां बदन में
सच में ही मौजीजा कर गए वो

            या ओळींमध्ये त्या प्रेमाची भावना कळते.ती येण्याआधी त्याच्या आयुष्यात जास्त रंग भरलेले नाहीत परंतु ती आल्यावर त्याला जीवन आनंदी वाटू लागले.ती यायच्या आधी त्याच्यात आत्मविश्वास नव्हता, त्याला स्वतः मध्ये फार कमी आहे असं वाटायचं. परंतु ती आल्यावर हा आत्मविश्वास वाढतो.

थक के सोयी हुई जिंदगी थी
हलके हलके जगाकर गए वो

दूर कर मेरा एहसासे कमतर
मुझसे मुझको मिलाकर गए वो

                प्रियकराच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता.ज्या लोकांनी त्याला त्रास दिला त्यामुळे त्याच्या मनात होणाऱ्या वेदनांना त्याने दाबून ठेवले होते.त्याच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी घडल्या किंवा ज्या कठीण परिस्थितीशी तो झुंज देत होता त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद त्याला मिळाली होती.
 
शर्म,डर,अश्क थे सब मुकैयद
कैदियों को रिहा कर गए वो

मेरी बंजर जमीं की सतह पर
पेड़ पौधे उगाकर गए वो

हो गई अमावस भी उजली
ऐसी शमा जलाकर गए वो

आता त्याचा आत्मविश्वास वाढला.त्याला परिस्थितीला सामोरे जाता येते.त्याला आता सकारात्मक विचार करता येत आहे. येणाऱ्या संकटाशी सामना करता येत आहे.

जो चमकते थे मेरे ज़हन में
शक के जुगनू भगाकर गए वो

खुल रहे अब तो ताले पे ताले
कैसी चाबी घुमाकर गए वो

ती त्याला साथ देत आहे आयुष्यात येणाऱ्या संकटाशी लढायला शिकवत आहे.

जद में तूफान की था समंदर
फिर भी कश्ती खिवाकर गए वो

मै तो अंजान था कायदों से
खेल फिर भी जिताकर गए वो

ती जेंव्हा जाते तेंव्हा तो पुन्हा हताश होतो तिला जाऊ नकोस म्हणतो तेंव्हा ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते -

' है अंधेरा न जाओ' कहा तो
रुखसे पर्दा हटाकर गए वो

एक घुंघराला काला हिमाला 
ओढ़नी में छुपाकर गए वो

ती गेल्या नंतर तिच्या बद्दल विचार करत प्रियकर तिच्या बद्दल लिहतो-

यूं लगा देख अंगड़ाई उनकी
शाखे गुल को हिलाकर गए वो

उन पहाड़ों के झरनों में शायद
चूड़ियां खनखनाकर गए वो

चाल चिते की है या हिरण की
तीर को भी हराकर गए वो


त्यांच्या भेटी गाठी व्हायला लागल्या 

लो वो आये, गये, फिरसे आये
वक़्त को यू नचाकर गए वो

उनका साया था इतना घना
दिन में तारे दिखाकर गए वो

एक दिवस ती आलिच नाही.दुसऱ्या दिवशी ही आली नाही.तो वाट बघू लागला त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले

वो गए तो अभी तक ना लौटे
क्या मुझे बरगलाकर गए वो

कस्मे क्या सिर्फ रस्में थी बेज़ा
जिनको यूहीं भुलाकर गए वो

त्याला शंका यायला लागली.तिने आपल्याला सोडले.आता पुन्हा भीती वाटायला लागली

मै उजालों से डरने लगा हूं
मुझको उल्लू बनाकर गए वो

एक मछली थी पानी के अंदर
उसको बाहर बुलाकर गए वो

आता त्याला तिचा राग यायला लागला.तिच्यामुळे तो जीवन जगायला लागला होता तिनेच त्याला संकटाशी लढायला शिकवले होते.

मैं निभाता जमाने से लेकिन
क्यू बगावत सिखाकर गए वो

थी किनारों पे रहने की आदत
बीच धारे में खड़ा कर गए वो

मैं रहा अब न मेरा कसमसे
मुझको मुझसे जुदा कर गए वो

आता त्याला जगणे कठीण झाले.विरहात होणाऱ्या वेदना त्याला असह्य झाल्या.लोक त्याच्याकडे पाहून हसायला लागले. तो शुद्धीवर नव्हता.सारखा तिचाच विचार. त्याला जगणे असह्य होत होते.
 


लोग हसते है बच्चे चिढाते है
क्या मुझे बावला कर गए वो

इंतज़ार, इंतज़ार, इंतजारी
कितनी लंबी सज़ा कर गए वो

मग एक दिवस तिच्या न येण्याचे कारण समजले ती आता कधीही येणार नव्हती.तिने धोका दिला नव्हता.या आयुष्याने तिला धोका दिला होता.मृत्यूने तिला जवळ ओढले आणि तिच्या प्रियकरापासून दूर नेले.

कैसे आयेंगे मय्यत पे मेरी
खुदको पहले बीदा कर गए वो

जिसको चाहो तो मरकर भी चाहो
ये कहावत निभाकर गए वो

जब ये ठहरा था मिलकर चलेंगे
खुद ही क्यू फैसला कर गए वो

दे सका न मै कांधा भी उनको
मुझसे आंखे चुराकर गए वो

तिचा विरह असह्य होता,तिच्या शिवाय जगणे कठीण होते, आणि शेवटी तो म्हणाला

क्या करू,क्या करू, क्या करू मै
कितना बेबस बनाकर गए वो

ए ' कलीम ' अब कहो अलविदा
सबका हाफ़िज़ खुदा कर गए वो

               एका प्रेम कथेचा अंत झाला.शांत. शांत. शांत. कविवर्य कलीम खान यांनी एक संपूर्ण प्रेमकथा या गझल मध्ये मांडली आहे.प्रेमकथा तर आहेच शिवाय आपल्या संपूर्ण जीवनातील येणारी सुखदु:खे,त्या सुख दुःखात साथ देणारी माणसं ,साथ सोडून जाणारी माणसं.जीवन आहे तोपर्यंत जगावं लागतं.शेवटी मृत्यूने त्याचा अंत होतो. कविवर्य कलीम खान यांचे 'कलीमच्या कविता', 'कलीम के दोहे', 'गज़ल कौमुदी','मंजर' हे संग्रह प्रकाशित झाले तर ' चांद की टहेनीयां' , 'सूर्याच्या पारंब्या ' ,' कलीम की रुबाईया' हे संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
...............................

समीना शेख

2 comments: