१.
आज आकाशी उजळले चंद्र तारे
पौर्णिमेच्या सोबतीला गार वारे
घाव भरला ना कधीही या मनाचा
तप्त होते भावनांचे का निखारे
ना कुणाला काळजी या लेकरांची
कोवळे वय झेलते बघ दुःख सारे
शांत झाल्या सागराच्या आज लाटा
साद घालत फार होते मज किनारे
वेदनांनी त्रासलो मी वाटते मज
सोबती माझ्या कुणी ना झुंजणारे
२.
आज पैशाने जरी केली दिवाळी
दीन हाताने खरी केली दिवाळी
घाम गाळत पोट भरतो आजही
तू ढेकळे फोडत घरी केली दिवाळी
पोट भरण्या भटकतो आता अनाथा
भीक मागत साजरी केली दिवाळी
कर्ज धान्याचे फिटेना फार आता
फास लावत पांढरी केली दिवाळी
एक पणती लावण्याला तेल नाही
दुःख लपवत हासरी केली दिवाळी
..................................
वसुदेव गुमटकर
(देवकुमार )
सुभानपूर, बुलढाणा
दोन्ही गझला सुंदर! हार्दिक अभिनंदन!
ReplyDelete