१.
वागणे तुझ्या प्रमाणे येत नाही
वाकणे तुझ्या प्रमाणे येत नाही
सोडले तू क्षुल्लकशा कारणाने
सोडणे तुझ्या प्रमाणे येत नाही
त्रासले सारे तुला या वर्तनाने
भांडणे तुझ्या प्रमाणे येत नाही
काय सांगू आजचे हे दर्द गाणे
गायला तुझ्या प्रमाणे येत नाही
शोधते तू रोज अंधारात वाटा
पाहणे तुझ्या प्रमाणे येत नाही
कारनामे फार झाले क्रूरतेचे
तोडणे तुझ्या प्रमाणे येत नाही
आडवे संस्कार माझे फार आले
माजणे तुझ्या प्रमाणे येत नाही
२.
जीवना तू क्रूरतेने वार केले
मी तयांना माळलेले हार केले
कस्पटाला पाहिले ना काळजीने
मीच त्यांचे वार नाना तार केले
छाटतांना पंख त्यांना मोद होतो
मी मनाला धैर्यशाली घार केले
संकटांच्या डोंगरांना मी न भ्यालो
मी तयांना धाडसाने पार केले
सांगतो मी कष्ट आता फार झाले
मीच माझ्या वर्तनांना खार केले
छेदती ते शस्त्र त्यांचे काळजाला
मी मनाला स्वागताचे दार केले
मी कशाला घाबरू वा भिंत बांधू
मीच माझ्या जीवनाला सार केले
पाहिली ना वाट त्यांच्या पाळतीची
मीच माझ्या बंदुकीने बार केले
जिंकण्याचे भास त्यांचे खूप भारी
मीच माझे स्वप्नही साकार केले
....................................
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे
मोबाईल - ७०३८२७६५५८
No comments:
Post a Comment