चल जमते का करून पाहू
दुसऱ्यासाठी मरून पाहू
आज येवु दे दु:ख सोबती
हात तयाचा धरून पाहू
किती जिंकलो डाव वेदने
खेळ सुखाचा हरून पाहू
काय खरे ते मरणा मधले
स्मशान तिरडी वरून पाहू
कशी असते सल हुंदक्याची
अश्रु मधूनी झरून पाहू
किती आनंदी जग फुलांचे
दोन ओंजळी भरून पाहू
कुठे लोपली आज संस्कृती
थडगे जुने उकरून पाहू
........................
तान्हाजी खोडे
नाशिक
वाह
ReplyDelete