१.
लोकनिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे
शेर गझलेचा असा दमदार झाला पाहिजे
आग धगधगती असावी एवढी डोळ्यांमधे
फक्त नजरेनेच शत्रू ठार झाला पाहिजे
थेट छातीवर करो पण वार पाठीवर नको
एवढा दिलदार माझा यार झाला पाहिजे
आपल्या नात्यात अनुभव जो मिठागत भेटला
तोच जीवन पोषणाचा क्षार झाला पाहिजे
छान मुरल्यावर उमाळे आठवांचे अंतरी
वेदनांचा गोड, आंबट खार झाला पाहिजे
२.
रीत दुनियेची मलाही पाळता येते
आपल्या गरजेप्रमाणे वागता येते
कोरडे नाते तुझ्याशी राखता येते
जोडता येते हवे तर तोडता येते
लाखदा येवोत दुःखे अंगणी माझ्या
ओंजळीमधल्या सुखांना वाटता येते
भोवती काळोख मोठा दाटतो जेव्हा
ज्योत आशेची नव्याने लावता येते
वाचले नाहीत मोठे ग्रंथ मी केव्हा
जीवनाच्या पुस्तकाला चाळता येते
बघ मला सुद्धा बहाणे सांगणे जमते
बोलण्याचे, भेटण्याचे टाळता येते
काळजावर तू कितीही वार कर माझ्या
काळजाच्या वेदनांना झाकता येते
३.
लपवेन अंतरी मी सारे गुपीत माझ्या
अंगार आठवांचा आहे धगीत माझ्या
ठेवू नकोस कुठली याहून तू अपेक्षा
स्वीकार जे मिळाले केवळ मिठीत माझ्या
विझणार पेटलेला वणवा क्षणात एका
सामर्थ्य ठेवले हे मी फुंकरीत माझ्या
गाठायचे नभाला ठरवून झोपल्यावर
येतात चांदण्यांची स्वप्ने कुशीत माझ्या
आयुष्य आज इतके गतिमान होत आहे
क्षण ठेवले निसटते काही मुठीत माझ्या!
थकशील एकदा तू दुःखा छळून मजला
घेशील तू विसावा तेव्हा कुशीत माझ्या
दर्शन अखेर दे तू केव्हातरी विठोबा
राखून श्वास तितके ठेवी कुडीत माझ्या!
........................
निशा डांगे/नायगांवकर
पुसद
वाह, सुरेख... तिन्ही गझला...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद गझलकार सीमोल्लंघन
ReplyDeleteआदरणीय श्रीकृष्ण राऊत सर
तीनही गझला छान आहेत निशा ताई.... मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹
ReplyDeleteवाह छान गझला निशा
ReplyDeleteवाहहह...खूप छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद दादा
Deleteखूप छान ताई
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Deleteवाह....निशाताई
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
Deleteवाह... कित्ती सुंदर...
ReplyDeleteतीनही गझल अप्रतिम
ReplyDeleteकाव्या शिरभाते
धन्यवाद काव्या
Deleteखूप छान निशा
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद अंजू ताई
ReplyDeleteथकशील एकदा तू दुःखा छळून मजला
ReplyDeleteघेशील तू विसावा तेव्हा कुशीत माझ्या
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद ताई
ReplyDeleteमनपूवर्क धन्यवाद स्मिता ताई
ReplyDeleteधन्यवाद ताई
ReplyDeleteवा अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या गझल आहेत....अप्रतिम आहे निशा ताई
ReplyDeleteछान गझला निशा
ReplyDeleteछान गझला
ReplyDeleteअतिशय सुंदर सर्वच गझल निशाताई
ReplyDeleteदमदार लेखन ,अभिव्यक्ती प्रभावी
ReplyDelete