१.
सामान्यांच्या हक्कासाठी राडा झाला
छोट्या छोट्या प्रश्नांसाठी राडा झाला
एका एका थेंबाचेही झाले वांधे
लोकांमध्ये पाण्यासाठी राडा झाला
काही केल्या काळा धंदा थांबत नाही
हप्ता बंदी हटण्यासाठी राडा झाला
मनरेगाच्या बाता नुसत्या जागोजागी
रोजंदारी मिळण्यासाठी राडा झाला
शेती गेली रस्ता गेला धरणाखाली
एका एका गुंठ्यासाठी राडा झाला
२.
मला स्वप्नात याचा भास झालेला
दुराव्याचा तुझ्या आभास झालेला
किती केली पराकाष्ठा विसरण्याची
तरीही तूच माझा ध्यास झालेला
अता संवेदना सरल्या मनाच्याही
तरी असतो सवे तू खास झालेला
पसाऱ्याची तुझ्या होती पुटे काही
झटकतांना मलाही त्रास झालेला
असे सांगून कोणाला पटे काही?
तुला माझा नसे अभ्यास झालेला!
No comments:
Post a Comment